ही अभिनेत्री अंथरुणाला खिळून असल्याचं समजताच मुख्यमंत्र्यांनी केली आस्थेने चौकशी

By  
on  

वच्छी आत्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही दिवसांपुर्वी भीषण अपघात झाला. एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला. तेव्हा पासून वर्षा या अंथरुणात आहेत. वर्षा या अपघाताच्या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे.

 

 

वर्षा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठवलं होतं. यावेळी आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. अलीकडेच वर्षा या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत उषा मावशीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. 

Recommended

Loading...
Share