आज पासून महाराष्ट्रात नाट्यगृह सुरु होत आहेत. लॉकडाऊननंतर रसिकांना नाटकांचा दिलखुलास आनंद घेता येणार आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘नाटकाची भूक कश्यावर ही भागत नाही. ती नाटकातच भागते! आजपासून रंगमंदिरं, नाट्यगृहं खुली होणार आहेत.
प्रचंड आनंद होत आहे. माझ्या सर्व नाट्यकर्मींना, 'नाटकवाल्यांना' ज्यांच्या कलाकृती आजपासून पुन्हा रंगमंचावर अवतरणार आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही! टेम्पोतून नेपथ्य आणलं जाणार आहे, lights लागणार आहेत, make up होणार आहे, sound check केला जाणार आहे, कपड्यांना इस्त्री होणार आहे, announcement होणार आहे, तिसरी घंटा वाजणार आहे....
पडदा उघडला जाणार आहे! आता बस ticket बारी च्या charts वर जास्तीत जास्त लाल रंगाच्या आडव्या रेषा लावण्याची जबाबदारी आपली रसिकांची! ती आपण पार पाडूच कारण आपण ही तेवढेच भुकेलेले आहोत. हे नटराजा, रंगदेवता तुझ्याकडे एवढीच प्रार्थना... इतक्या दीर्घकाळासाठी पडदा आता कधीच पडू देऊ नकोस!