'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' च्या सेटवर खरंच बिबट्या आला?

By  
on  

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय कौटुंबिक मालिका. या मालिकेतून मोठं कुटुंब, गोतावळा, चालीरिती आणि ग्रामीण भागाचं दर्शन प्रेक्षकांना होतंय. आंबट-गोड मनोरंजन करणारी ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. 


सगळ्यांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. परंतु, मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका सीनची सध्या जोरदार चर्चा रंगलीय. म्हणे मालिकेत दाखवण्यात आलेला बिबट्या हा सेटवरचा  खरा बिबट्या आहे. मालिकेत चित्रित केले जाणारे सीन खरं तर तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रित केले जातात पण मालिकेत दाखवण्यात आलेला बिबट्या खरा असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

आता हा खरा बिबट्या आहे की हुबेहुब बिबट्याची नक्कल केली गेली आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे होत आहे. मालिकेचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी काही दिवस सेटवर बिबट्याचा वावर होता असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला खरा बिबट्या आता मालिकेत कथानकाच्या स्वरूपात दाखवण्यात येत आहे.

पण याबाबत मालिकेच्या टीमकडून मात्र कुठलाच खुलासा अद्याप झालेला नाही. 

Recommended

Loading...
Share