आता तुम्ही घेऊ शकता 'सोनाली पैठणी', अप्सरेच्या अदांवर चाहते घायाळ

By  
on  

आपल्या अभिनयासोबतच नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना खुप उत्सुकता असते. 

विशेष म्हणजे सोनालीचं साड्यांवर विशेष प्रेम आहे. विविध साडी लुकमधले फोटो ती नेहमी चाहत्यांशी  शेअर करते. पण अप्सरेने नुकत्याच शेअर केलेल्या पैठणीत ती खुपच सुंदर व मोहक दिसतेय. 

सोनालीच्या या पैठणीतील लुकवर चाहते घायाळ झाले आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे ह्या पैठणीचं नाव सोनाली पैठणी आहे. आश्चर्यचकित झालात ना, पण हे खरं आहे. एका पैठणीच्या ब्रॅण्डचं नाव सोनाली पैठणी आहे. 

या साड्यांच्या ब्रॅण्डने म्हणून उद्घाटनासाठी  खास सोनालीलाच नाशिक येथे  पाचारण केलं . 

सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत या सोनाली पैठणीचं थाटात उद्घाटन झालं 

Recommended

Loading...
Share