अभिनेत्री निशिगंधा वाड यांची दमदार भूमिका असलेला 'द अननोन नंबर'

By  
on  

एफएनपी मीडिया निर्मित बहुप्रतिक्षित  शॉर्ट फिल्म 'द अननोन नंबर' ज्यामध्ये अभिनेत्री निशिगंधा वाड आणि गौरव बिश्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जतिन चनाना यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक जतिन चनाना म्हणतात, 'द अननोन नंबर' ही मानवी भावनांची सुंदर कथा आहे. जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि मला खात्री आहे की हि  शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना मोहित करेल. 'द अननोन नंबर' ही महामारीच्या काळात आम्ही पाहिलेल्या अनेक हृदयस्पर्शी कथांपैकी एक आहे, परंतु हा चित्रपट तुमचे जीवन बदलून टाकेल आणि आशा आणि सकारात्मकतेची छाप सोडेल.

निर्माता विकास गुटगुटिया म्हणाले, "दिग्दर्शक जतिन चनाना दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांशी एक मजबूत कथानकासह जोडतो. अभिनेत्री निशिगंधा वाड आणि गौरव बिष्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाने जगभरातील मनोरंजन केलं आहे. आमच्यासाठी ही एक मोठी प्रेरणा आहे की चित्रपटाचा टीझर रिलीज झाला त्या दिवसापासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मी 'द अननोन नंबर' चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट आणि क्रूचे अभिनंदन करू इच्छितो".

 

 

एफएनपी मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाल्यानंतर  'द अननोन नंबर' ट्रेंड करण्यासाठी तयार आहे.

Recommended

Loading...
Share