“खेळू झिम्मा गं…” झिम्मा सिनेमाचं धमाकेदार टायटल सॉंग पाहिलंत का?

By  
on  

‘झिम्मा’  या हेमंत ढोमे दिग्दर्सित बहुचर्चित सिनेमाचं टायटल सॉंग नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यात अनेक अभिनेत्रींना एकत्रित धम्माल करताना पाहायला मिळणार आहे. करोना लॉकडाऊनमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 

नुकतंच या सिनेमाचं टायटल सॉंग उलगडलं आहे. विविध वयोगटातील महिलांच्या प्रवासाची धम्माल गोष्ट सिनेमात अनुभवता येणार आहे. हे गाणं खुपच एनर्जेटिक आहे. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग एकच धम्माल उडते. 

 

 

या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share