'पाहिले न मी तुला' फेम अभिनेत्री तन्वी मुंडले हिला पितृशोक

By  
on  

'पाहिले न मी तुला' लॉकडाऊननंतरच्या काळात भेटीला आलेली आणि एका वेगळ्याच विषयावर बेतलेली मालिका. या मालिकेने अल्पावधितच आपला प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले हया नव्या चेह-याने छोट्या पडद्यावर पदार्पण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत मानसी उर्फ मनूची भूमिका करणा-या अभिनेत्री तन्वी हिच्या वडीलांचं नुकतंच निधन झालं आहे. सोशल मिडीयावर एक हदयस्पर्शी पोस्ट शेयर करत तन्वीने बाबांबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

तन्वीने इन्स्टाग्रामवर बाबांचे फोटो शेयर करत लिहते, , 'तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु…जेव्हाही माझी वेळ येईल तेव्हा मी तुला नक्की भेटेन.' तन्वीच्या वडिलांबाबतची ही बातमी ऐकताच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तन्वीच्या जवळच्या व्यक्तींनाही याबद्दल माहित नसल्याचं यावरून दिसून येतंय. 

 

तन्वीला ह्या धक्क्यातून सावरण्याची देव शक्ती देवो, हीच प्रार्थना चाहते आणि कलाकार मंडळी करत आहेत.  

Recommended

Loading...
Share