विराजस कुलकर्णीच्या या टॅलेंटचं चाहते करत आहेत कौतुक

By  
on  

‘माझा होशील ना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. विराजस कुलकर्णीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. आदित्य म्हणून लोकप्रिय असलेला विराजस या व्हिडियोमध्ये खास पाहुण्यासोबत दिसतो आहे. या व्हिडियोमध्ये विराजस आता स्लॅपी या पपेट म्हणजे बोलक्या बाहुल्यासोबत दिसतो आहे.

 

 

स्लॅपी हा ‘Goosebumps’ या हॉलिवूड सिनेमातील एका व्हिलन बाहुल्याचं नाव आहे. विराजस हा कुणालाही कळू देता सराईतपणे बाहुल्याला बोलकं करताना दिसत आहे. विराजसचं हे नवं टॅलेंट पाहून सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडियो खास आवडताना दिसतो आहे. माझा होशील ना मालिकेने निरोप घेतल्यानंतर विराजस अजून कोणत्या प्रोजेक्टमधून समोर येईल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share