सुबोध भावे स्टारर “विजेता “ सिनेमा पुन्हा होतोय प्रदर्शित, पाहा Trailer

By  
on  

मुक्ता आर्ट्स ची निर्मिती असलेला  चित्रपट "विजेता" येत्या  १२ मार्च 2020  रोजी रिलीज झाला होता पण  कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन एका दिवसात मागे घेण्याचा निर्णय सुभाष घाई यांनी घेतला . पण आता परिस्थिती पुन्हा हळू हळू पूर्व पदावर येत आहे आणि मुक्ता आर्टस् ने विजेता चे पुन्हा प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला .

या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के,मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर  या कलावंतांचा समावेश आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. सौमित्र पुढे महाराष्ट्राला जिंकवून देणं हे त्याचं ध्येय असतं . तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो . त्या सर्वां मधील हरवलेलाआत्मविश्वास कसा परत आणतो , त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो  हे सर्व तुम्ही अनुभवू शकाल विजेता मध्ये , येत्या 3 डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ...

Recommended

Loading...
Share