By  
on  

सलील कुलकर्णी यांनी घेतलेला हा निर्णय ऐकून तुम्हीही म्हणाल वा !!

गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांची अनेक गाणी प्रेक्षकांना कायम श्रवणीय वाटतात.  केवळ संगीतातच नाही तर दिग्दर्शनातही सलील यांनी खास ठसा उमटवला आहे. सलील यांनी ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमाबाबत सलील यांनी महत्त्वाची बाब शेअर केली आहे.

 

 

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘नमस्कार मित्रांनो , लॉकडाउनच्या आधीपासून मनांत एक विचार येतो आहे .. आपल्याकडे अनेक वर्ष गाण्याच्या उत्तमोत्तम मैफिली ऐकणारे अनेक रसिक आहेत .. त्यांच्यापैकी काही जण आता वयोमानानुसार घराबाहेर पडू शकत नाहीत .. अगदी काल -परवा सुद्धा कार्यक्रमांत भेटणारे अनेक रसिक बोलता बोलता सांगत होते कि, आमचे आई, बाबा किंवा मावशी, काका पूर्वी तुमच्या मैफिलीला नक्की यायचेच पण आता ते थकले आहेत किंवा आजारी आहेत , त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही .. प्रत्यक्ष (लाईव्ह ) गाणं ऐकणं ह्या गोष्टीचं महत्वं किती आहे हे आपल्या सगळ्यानांच आताच्या काळाने दाखवून दिलं आहे .

तर ... या ज्येष्ठ मंडळींना नाट्यगृहापर्यंत येता येणार नाही .. पण मी त्यांना भेटून अर्धा तास गाणी नक्की ऐकवू शकतो .. !! त्यामुळे डिसेम्बर पासून ज्या घरात असे रसिक आजी आजोबा आहेत ज्यांना आता कार्यक्रमाला येत येत नाही त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा म्हणून . त्यांना भेट म्हणून काही गाणी ऐकवायची इच्छा आहे . महिन्यातून किमान एखाद्या जोडप्याला किंवा ग्रुपला असा आनंद देऊ शकलो तर खूप समाधान मिळेल .
ज्यांना असं मनापासून वाटतं कि माझ्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना गाणी ऐकायची ओढ आहे आणि त्यांना खरोखर शक्य नाही त्यांनी [email protected] वर लिहा .
( ह्यात ज्येष्ठ मंडळींना आनंदाचे काही संगीतमय क्षण देण्या पलीकडे माझा काहीही उद्देश नाही तसाच प्रामाणिक हेतू असणाऱ्या लोकांनीच संपर्क करा ) भेटूच .. सध्या पुण्यात आणि जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला तुमच्या गावांत येईन तेव्हा तिथे.’ सलील यांच्या या निर्णयाचं चाहत्यांसह कलाकारही कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive