By  
on  

अभिनेता भुषण प्रधानने शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत हा व्हिडियो केला शेअर

अभिनेता भुषण प्रधान सध्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत दिसतो आहे. या मालिकेत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. या मालिकेतील खास व्हिडियो त्याने शेअर केला आहे. आज शिवप्रताप दिन आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता.

 

 

याबाबत भुषणने एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘शिवप्रतापदिन - किल्ले प्रतापगड. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी प्रतापगडावर जे काही झालं, ते नक्कीच तत्कालीन वर्तमानाला कलाटणी देणारं होतं. भविष्याचा मार्ग निश्चित करणारं होता. त्या घटनेने केवळ मराठ्यांचा आत्मविश्वासच वाढवला नाही, तर शत्रुच्या मनात मराठ्यांविषयी कायमस्वरुपाची भीतीची भावना निर्माण केली. तो केवळ राजकीय किंवा सामरिक विजय नव्हता, तर प्रचंड असा मानसिक विजय होता.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive