By  
on  

'युवा डान्सिंग क्वीन' फेम प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक मयुर वैद्य अडकणार लग्नाच्या बेडीत

टेलिव्हिजनवरील 'युवा डान्सिंग क्वीन'  हा अभिनेत्रींचा डान्स शो प्रचंड गाजला होता. महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी  आणि प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक मयुर वैद्य यांनी या शोचं बहारदार परिक्षण केलं. नुकतंच मयुर वैद्यने साखरपुडा केल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे. मयुरने त्याची बेस्ट फ्रेंड मधुरा देशपांडेसोबत साखरपुडा केला असून लवकरच ते विवाहबंधनात अडकतायत. 

मयुर वैद्यने शेयर केलेल्या पोस्टवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 

मयुर वैद्य हा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक तर आहेच शिवाय कथ्थक विशारदही आहे. तर मधुरा देशपांडे ही देखील कथ्थक विशारद असून तिने संगीतामध्ये एम.ए. पदवी घेतलेली आहे. मयुरने आतापर्यंत भारतात आणि भारताबाहेर कथ्थकचे अनेक कार्यक्रम केले आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive