By  
on  

‘माझं कॉलेज संपून 19 वर्षं झाली पण......’ हेमांगी कवीने शेअर केली पोस्ट

कॉलेज जीवन आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात खास कप्पा असतो. एक ना दोन अशा हजार आठवणी या कॉलेजजीवनाशी जोडल्या गेलेल्या असतात. अभिनेत्री हेमांगी कवीही कॉलेज जीवनाच्या आठवणी शेअर करताना दिसते आहे. हेमांगीने तिच्या जे.जे स्कूल ऑफ फाईन आर्ट्स विषयी शेअर केलं आहे.  ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘सर ज. जी. कला महाविद्यालय Sir J. J. School of Fine Arts माझ्यासाठी हीच माझी पंढरी आणि इथला campus, चित्र, शिल्प, शिक्षक, वर्ग, canteen, इथली झाडं, माती, छोट्यातला छोटा दगड म्हणजेच माझे पांडुरंग आणि रखुमाई!

 

 

College संपून आता १९ वर्ष झाली पण आठवण आली की मी इथं येते. मुळं सैल, भुसभुशीत वाटू लागली की मी इथं येते. या वास्तूच्या गाभाऱ्यात थोडा वेळ बसलं, श्वास घेतला की डोळे आपोआप बंद होतात. ध्यानस्थ होतो आपण. मग सैल, भुसभुशीत झालेली मुळं पुन्हा घट्ट होऊ लागतात. खरंच! इथे शिकलेला प्रत्येकजण पदवी घेऊन कलाकार होऊन तर बाहेर पडतोच पण त्याहीपेक्षा एक संवेदनशील माणूस म्हणून तयार होतो.

ज्याला जगाकडे जरा वेगळ्या नजरेने पाहण्याचं वरदान आपोआप प्राप्त होतं आणि याचा त्याला साक्षात्कार वेळोवेळी होत राहतो. इथं शिकलेला कुणीच हे अमान्य करणार नाही याची मला 100 टक्के खात्री आहे. ️मला अनेक जण भेटतात आणि म्हणतात मी पण जे जे चा. खरंतर ते या college चे विद्यार्थी कधीच नव्हते पण कधी campus मध्ये तर कधी जे जे च्या canteen मध्ये नुसतं बसायला यायचे म्हणून मी पण जे जे चा.

हे म्हणजे पांडुरंगाच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन न मिळालेला पण वारीत सामील झाला म्हणून 'मी पण पांडुरंग पाहिला' म्हणणारा! ही किमया आहे इथली.  1997 ते 2002 मधली इथली माझी 5 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम काळ जो आतापर्यंत मला पूरक ठरत आलाय आणि यापुढे ही... आजन्म पूरक ठरेल. येत्या सोमवारपासून सक्तीच्या पन्नास टक्के हजेरीने का होईना या पंढरीची दारं पुन्हा उघडणार आहेत.

तब्बल दोन वर्षांनी पण Admission ची गर्दी जरा ही ओसरु दिली नाहीए इथल्या पांडुरंगाने आणि हीच इथली चुंबकीय जादू जी आसुसलेल्या भक्तांना इथं खेचून आणते! लवकरच 100 टक्के हजेरीने पुन्हा ही पंढरी कलानादाने दुमदुमून जावी, माझ्यासारखे अनेक भाग्यवान त्यात न्हाऊन निघावेत हेच खऱ्या पांडुरंगाकडे साकडं!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive