By  
on  

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर पुन्हा हिंदी मालिकांमध्ये, झळकणार या ऐतिहासिक मालिकेत

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. अलिकडेच त्यांनी 'स्वामिनी' या मराठी मालिकेत त्यांनी पेशवे घराण्यातील गोपिकाबाई यांची व्यक्तिरेखा साकारली होती. आता पुन्हा एखादा त्या पेशवे घराण्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहेत. परंतु मराठी नाही तर हिंदी मालिकेत

'काशीबाई बाजीराव बल्लाळ' असं या मालिकेचं नाव असून त्यात त्या राधाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' या हिंदी मालिकेचे प्रोमोज् सध्या टीव्हीवर मोठ्या प्रमाणावर झळकतायत. या ऐतिहासिक मालिकेची प्रेक्षकांना खुपच उत्सुकता लागून राहिली आहे. 

याबद्दल ऐश्वर्या यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं, 'बऱ्याच काळानंतर हिंदी मालिकेत काम करण्याचा योग जुळून आला आहे. मालिकेत राधाबाईंसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारण्यास मी उत्सुक आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive