By  
on  

डॉ सलील कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘एकदा काय झालं'च्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवामध्ये निवड झाल्यानंतर डॉ. सलील कुलकर्णी यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘एकदा काय झालं...’च्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे रोवले गेले आहेत. या चित्रपटाची निवड इंडियन पॅनोरमा फिल्म फेस्टिव्हल 2021आणि सोशल वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल 2021   साठी अधिकृतरित्या झाली आहे.गजवदना' प्रॉडक्शन्स’ आणि ‘शोबॉक्स एंटरटेन्मेंट’ची निर्मिती असलेला‘एकदा काय झालं...’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार  आहे.

“एकदा काय झालं...’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.  प्रमुख भूमिकेतील बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रेची निवड तब्बल १५०० मुलांच्या चाचणीतून केली गेली. “हा मुलगा जळगाव येथील चाळीसगावचा आहे . त्याने ही निवड सार्थ ठरवलीय. 

आघाडीचे संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसराच सिनेमा असल्याने या चित्रपटाची सर्वत्र प्रतीक्षा आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ या त्यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटाने प्रेक्षक व मान्यवरांची वाहवा मिळविली होती, यामुळे ‘एकदा काय झालं...’कडूनही अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. य चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले अशा नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराची यात मध्यवर्ती भूमिका आहे.हि ऐका गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.  

चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमील शृंगारपुरे व सौमेंदू कुबेर यांची शोबॉक्स एंटरटेन्मेट; अरुंधती दाते, अनुप निमकर, सलील कुलकर्णी तसेच नितीन प्रकाश वैद्य यांची ‘गजवदना' प्रॉडक्शन्स’ यांच्यातर्फे संयुक्तपणे होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive