By  
on  

केदार शिंदेंनी या खास जोडीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अवघ्या महाराष्ट्राला पैठणीच्या महावस्त्राचा मान देणारे आदेश भाऊजी आणि त्यांच्या होम मिनिस्टर सुचित्रा बांदेकर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आदेश आणि सुचित्राया जोडीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये केदार म्हणतात, ‘ #Aadesh Bandekar आणि #Suchitra Bandekar हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे.

 

 

 

जगभरात आदेश पैठणी वाटत असला तरी, घरात सुचित्रा Home minister आहे यात शंका नाही. त्यांनी आमच्या कुटुंबाला कधी त्यांच्या कुटुंबात सामावून घेतलं हे समजलंही नाही. सोहम वर एक मुलगा म्हणून जेवढं प्रेम.. तेवढीच सनाला मुलगी म्हणून माया.... आमच्या सुखात तर सोबत असतातच पण, दु:खात पाठीशी स्वामी म्हणून दोघं उभे रहातात. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस... हा जोडा असाच रहावा, अगदी लक्ष्मीनारायणालाही हेवा वाटावा, याच शुभेच्छा..’ केदार यांच्या पोस्टवर चाहतेही या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive