By  
on  

ठरलं तर ! या दिवशी ‘झोंबिवली’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी सिनेमात पहिल्यांदाच झोंबिवलीच्या निमित्ताने हॉरर कॉमेडीचा हटके प्रयोग होतो आहे. सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

या सिनेमाच्या रिलीजबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. या सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे. 4 फेब्रुवारी 2022 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा सिनेमा ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

अमेय वाघने वाढदिवसाचं औचित्य साधत नवीन पोस्टर आणि रिलीज डेट शेअर केली आहे. झोंब्यांच्या टोळीला रोखण्याचा नाहीए कुणालाच clue ! तयार राहा फ्रेंड्स! हे कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive