By  
on  

पांडूच्या अतरंगी उषाला भेटलात का? पाहा हा व्हिडियो

भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेल्या पांडू सिनेमाने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  'भाऊ कदम' आपल्याला 'पांडू' च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके 'महादू'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये.

 

 

आता या पांडूच्या आयुष्यात झालीये एक ग्लॅमरस एंट्री. ती आहे उषाची. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यात उषाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सोनाली बेधडक अंदाज दिसणार आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आणि विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला 'पांडू' येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive