By  
on  

पूजा सावंतचं हिंदी गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर ब-यापैकी सक्रीय असते. अनेक फोटोशूट आणि रील व्हिडीओंमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधते. पूजा नेहमीच विविध स्टाईल लुक्स कॅरी करण्याला प्राधान्य देते. स्टाईल आयकॉन पूजा सावंतचं प्रत्येक फोटोशूट खास असतं. पूजाच्या या अदा चाहत्यांना फिदा करतायत. 

'सुमन एंटरटेनमेंट'ने मराठी भाषेत अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली असून त्यांच्या प्रत्येक गाण्याला संगीतरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. दर्जेदार गाण्यांची निर्मिती करणारे 'सुमन एंटरटेनमेंट' आता हिंदीत पदार्पण करत आहे.

मराठी प्रमाणेच हिंदीतही दर्जेदार गाण्यांची निर्मिती करण्याचा 'सुमन एंटरटेनमेंट'चे सर्वेसर्वा केदार जोशी यांचा मानस आहे. त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्यात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत दिसणार आहे.

‘सुमन एंटरटेनमेंट'ची या पुढील गाणी जरी हिंदी असली तरी या गाण्यांसाठी प्राधान्य मराठी कलाकारांना देऊन, हे चेहरे जगभरात पोहोचवण्याचा या निर्मिती संस्थेचा प्रयत्न असून लवकरच पंजाबी आणि गुजराती भाषांमध्ये देखील 'सुमन एंटरटेनमेंट'ची उत्तम गाणी प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive