सात जणी आणि एक धमाल ट्रीप यावर बेतलेली गोष्ट म्हणजे झिम्मा. ‘झिम्मा’ची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तेव्हापासूनच या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे 'झिम्मा'.
या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री क्षिती जोग निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. तर हेमंत ढोमे या सिनेमाचं दिग्दर्शन करतो आहे. हेमंतने त्याच्या या टीमसाठी खास मेसेज केला आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘या सगळ्यांनी डोक्याची मंडई केली…
बेक्कार पिडला… कान फाडले!
लय छळला!
पण माझा सिनेमा हक्काने आपला केला… खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या झिम्मा चा सोहळा केलात!’
हा सिनेमा 19 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.