By  
on  

अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरच्या या कृतीचं तुम्हीही कराल कौतुक

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंताची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची खास लाडकी आहे. या मालिकेतील शेवंताच्या व्यक्तिरेखेने अपुर्वा नेमळेकरचं नाव घराघरात पोहोचवलं. अभिनयाशिवाय अपुर्वाचा स्वत:चं ज्वेलरी कलेक्शनही आहे. तिच्या  अपूर्वा कलेक्शन्सची एक शाखा काही दिवसापुर्वीच साता-यात सुरु झाली. यावेळी तिने एका उपक्रमा अंतर्गत गरजूंना मदत केली.

 

 

याबाबत अधिक तिने पोस्टमधून शेअर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अपुर्वा म्हणते, ‘समाजातील गरीब आणि दुर्लक्षित भीक मागणाऱ्या वयस्कर, अनाथ अशा लोकांचं पालनपोषण करणं,त्यांना,शासनाकडून जेवण, कपडे, निवास या सुविधा देऊन, त्यांच्या राहणीमानातं सुधारणा करने, वैद्यकीय सेवा देण्याचं कार्य सरकार कडून भिक्षेकरी गृह मार्फत केल जात...

मी अपूर्वा कलेक्शनस् या उपक्रमाची सातारा मध्ये नव्याने सुरुवात केली. आपल्या परिसराने जे काही आपल्याला दिले त्याबद्दल आपण त्याला काही देणे लागतो...या दिवाळीत. सातारा येथे असलेल्या पुरुष भिक्षेकरी गृहात जाऊन मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली..आणि त्यांची जीवनक्रिया पाहून मी खुपच भावुक झाले..

आपण सर्वजण दिवाळी साजरी करत असताना अशा उपेक्षित लोकांची सेवा करुन त्यांना गोडधोड खायला देऊन, त्यांच्या चेह्यावरच्या आनंदाचं वर्णन करताच येत नाही. शासन तर करत असतेच, परंतु समाजातील प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे अशा उपेक्षित लोकांना मदतीचा हात देऊन या लोकांच्या जीवनात आनंद वाढवाला पाहिजे..

Author

Recommended

PeepingMoon Exclusive