By  
on  

अभिनेता भुषण प्रधानने कोस्टार अजिंक्य देवविषयी व्यक्त केल्या भावना

अभिनेता भुषण प्रधान सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो.  भुषण सध्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज साकारतो आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे साकारत आहेत. पण आता अजिंक्य या मालिकेचा निरोप घेणार आहेत. यावेळी भुषणने खास पोस्ट करत अजिंक्यविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

 

आपल्या पोस्टमध्ये भुषण म्हणतो, ‘पावनखिंड इतक्यात नको… पुढे जाइल तर बरे… गेले अनेक आठवडे असेच वाटत होते. पण अखेर तो दिवस आला.. आमचे बाजी जाणार! प्रोमोशूट चा दिवस आठवतो. नुकताच typhoid च्या तापातनं उठून शूट ला गेलो. छत्रपति शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा प्रोमो. त्या दिवशी Ajiknya Deo ह्यांना भेटलो…

पहिलीच भेट! संभाषणाला सुरूवात झाली तीच जणू अनेक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी. Sir - अजिंक्यजी, असे काही पर्याय न देता भेटताक्षणी तो अजिंक्य दादा झाला! प्रोमो शूट संपले… आणि न बोलताच एकमेकांना सांगून गेलो की एकमेकांना सांभाळत, एकमेकांवर विश्वास ठेवत आपला हा प्रवास सुखकर होणार! अजिंक्य दादा सेटवर आला की एक वेगळीच ऊर्जा सेटवर असायची.

एरवी खूप बोलणारा मी लॉकडाउन नंतर जरा कमी बोलायला लागलोय (कदाचित). पण दादा आणि मी सेट वर असलो आणि वेळ मिळाला की बोलावेसे वाटायचे, शेअर करावेसे वटायचे. एक उत्तम श्रोता (listener) … शांत आणि खरा स्वभाव, हसतमुख आणि अतिशय ग्राउंडेड. Fit & fine and a thorough gentleman.

आयुष्यात अनेक संकटांना सामोरा गेला असणार तरी चेहरा हासतमुख, कसलाच माज किंवा गर्व नाही… आणि अनुभवी असूनही प्रचंड मेहनती! ५ महिन्यांचा त्याचा हा मलिकेतील प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि मी एक मित्र, एक मोठा भाऊ कमावला.

‘५ महिन्यांनंतर अजिंक्य दादाचा मालिकेतील प्रवास संपणार’ हया विचाराने हळवा होत असताना, एक विचार मनात सारखा येतोय.. ‘घोडखिंडीत (पावनखिंडीत) बाजी प्रभू देशपांडे ह्यांना गमवल्यानंतर राजांना काय वाटले असेल’! छत्रपति शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापनेचा प्रवास चालू ठेवला असावा ते दुःख गिळून… पण ओलावा जपून!

अजिंक्य दादा, लवकरच भेटू… नवीन भूमिकेत आणि आपापल्या भूमिकेतही!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive