‘जीव झाला येडापिसा’च्या शिवा- सिद्धीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपलं स्थान निर्माण केलं. निरागस सिद्धी साकारत असलेल्या विदुलाचं फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे. मालिकेत शिवाला खंबीर साथ देणारी सिध्दी म्हणजेच अभिेनेत्री विदुला चौगुले आणि शिवा साकारणारा अभिनेता अशोक फळदेसाई या जोडीला प्रेक्षकांनी खुप प्रेम दिलं.
आज अभिनेता अशोक फळ देसाईचा वाढदिवस आहे. यावेळी सिद्धी म्हणजेच विदुला चौगुलेने खास पोस्ट शेअर केली आहे. विदुला आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘तुला भेटून 3 वर्षं झाली. अवघडलेलं संभाषण ते रोजच्या गप्पा असा आपला प्रवास झाला आहे. तुझ्यासोबतच्या आठवणींची मनात खास जागा आहे. हा खास बाँड अनंतकाळापर्यंत राहावा अशी इच्छा आहे. हॅपी बर्थ डे अशोक.’ ही जोडी या वर्षी गणपती बाप्पाच्या एका व्हिडीओसाठी ही जोडी एकत्र दिसली होती.