बिग बॉस मराठी हा टेलिव्हिजनवरचा रिएलिटी शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सद्या या शोचा तिसरा सीझन ऐन रंगात आला आहे. भांडण, वाद-विवाद, सूड , यश-अपयश यांनी खच्चून भरलेल्या या शोमध्ये आता केवळ 10 स्पर्धक उरले आहेत. मागील काही आठवड्यात घरात दोन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एन्ट्री घेतली पण घरातील सदस्यांपुढे त्यांचा केवळ दोन आठवडेच निभाव लागू शकला. पण अशातच आता एका सोशल मिडीया पोस्टमुळे एका वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.
गँगस्टर अरुण गवळी यांचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे हा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्याची इन्स्टाग्राम पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहेत.
बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरु आहे. “२ नवीन सदस्य, २ वाईल्ड कार्ड सहभाग, २ आठवड्यात घराबाहेर…” अशा आशयाची एक इन्स्टाग्राम पोस्ट त्याने शेअर केली आहे. यावर त्याने कॅप्शन लिहिताना अक्षय वाघमारे म्हणाला की, “वाईल्ड कार्डद्वारे सहभागी झालेले दोन्ही सदस्य २ आठ्वड्यात घराबाहेर पडले. नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीपेक्षा घराबाहेर पडलेल्यापैंकी काही सदस्यांना पुन्हा संधी मिळाली तर… काय वाटतं तुम्हाला ..??” असा प्रश्न त्याने विचारला आहे.