शिवरायांचा इतिहासाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडणारे शिवतपस्वी बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी खास पोस्ट शेअर करुन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या दरम्यान प्रशांत दामले यांच्या पोस्टवर नेटिझनने तुम्हाला बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठीही तुम्हाला वेळ मिळाला नाही का असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नावर प्रशांत दामले यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आनंद राज सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली तरच एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो असं काही नाही.
बाबासाहेब आम्हा कलाकारांच्या हृदयात आहे आणि राहतील. त्याचा गाजावाजा का करायचा?,” अशी कमेंट प्रशांत दामले यांनी या प्रश्नाला उत्तर देताना केली. प्रशांत दामले यांच्या या कमेंटला १२०० हून अधिक जणांनी लाईक केलं आहे.