By  
on  

सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘हे पुन्हा एकदा स्वप्नपूर्ती सारखं वाटतंय..’

येत्या काही दिवसातच ‘झिम्मा’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक नायिकांच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या सिनेमात दिसते आहे. सोनालीने या सिनेमात मैथिलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. साखरपुडा आणि लग्न या कालावधीमधील द्विधा मनस्थितीत असलेली मुलगी तिने साकारली आहे.

 

 

या सिनेमासाठी तिने खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘१८ महिन्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात आपला सिनेमा प्रदर्शित होणारे…. हे पुन्हा एकदा स्वप्नपूर्ती सारखं वाटतंय.. लहानपणापासून मोठ्या पडद्याची ओढ होती… त्याच्यावर झळकण्याची संधी १२ वर्षं सलग मिळाली…
Pandemic मुळे आपण सगळ्यांनीच अतिशय वाईट दिवस पाहिले, हा मोठा पडदा ही त्याला अपवाद नाही… पण या अश्या वाईट गोष्टी संपाव्यात आणि आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत म्हणून आपण “झिम्मा” हा खेळ खेळतो. आम्ही तो खेळायला सज्ज झालोय, १९ नोव्हेंबर पासून, तुम्ही पण या. सामील व्हा’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive