By  
on  

श्रेया बुगडेचं ते लॉकेट आणि बिग बॉस वाईल्ड कार्ड एंट्रीची चर्चा…….

सध्या मराठी बिग बॉसचा तिसरा सीझन सुरु आहे. घरातील रोज नवा वाद, प्रतिवाद चावडी आणि वाईल्ड कार्ड एंट्रीने या सीझनमध्ये रंगत आणली आहे. या घरामध्ये आतापर्यंत दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत. या दोन्हीही घरातून एलिमिनेट झाल्या आहेत. पण आता श्रेया बुगडेमुळे घरातील वाईल्ड कार्ड एंट्रीची चर्चा वाढली आहे. 

 

 

 नुकताच श्रेयाने एक फोटो शेअर केला. श्रेयाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या गळ्यात एक लॉकेट दिसत आहे. ते लॉकेटवर बिग बॉसचा लोगो आहे. तिने हे लॉकेट घालून चार फोटो शेअर केले आहेत. या चारही फोटोत तिचे लॉकेट स्पष्ट दिसत आहे. या फोटोमुळे श्रेया बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. अर्थातच यावर श्रेयाचा कोणताही रिप्लाय आला नाहीये.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive