असं म्हणतात मोहक हास्याचं वरदान मिळालेली माणसं कुणाचंही मन सहज जिंकू शकतात. अभिनेत्री हृता दुर्गुळेबाबतही असंच काहीसं म्हणावं लागेल. फुलपाखरु, मन उडू उडू झालं या मालिकेतून हृताने खास ठसा उमटवला.
हृता सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. हृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. तिने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हृता टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहला डेट करत आहे.
प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत तिने नात्याची कबुली दिली आहे. या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांकडे बघत आहेत. प्रतीक अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. हृताच्या या फोटोवर प्रिया बापट, आशुतोष गोखले, गौरी नलवडे, वैभव तत्ववादी, रवी जाधव यांनी कमेंट केल्या आहेत.