प्रसिध्द गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक राहुल देशपांडे आणि त्यांची गोड लेक रेणुका ही बाप-लेकीची जोडी सोशल मिडियाचं नवं सेंसेशन आहे. रेणुकाचे लोभस लूक आणि अवखळ वागणं प्रत्येकालाच मोहात पाडतं मुळातच दिसायला गोड असलेली रेणूका अनेकदा बाबा राहुल देशपांडेसोबत सोशल मिडियावर दिसते. कधी गाते, कधी खोड्या काढते, मस्ती करते, बाबासोबत गाणं गाते.
आत्तासुध्दा रेणुकाचा दुबईतला एक हटके पण तितकाच गोंडस फोटो बााबा राहुल देशपांडे यांनी शेयर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.
राहुल देशपांडे यांनी शेयर केलेल्या रेणुकाच्या या फोटोवर अनेक प्रसिध्द सेलिब्रिटींनी किती गोड म्हणून कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव केला आहे.