प्रिया बापट आणि उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. कधी एकत्र स्वयंपाक करताना तर कधी वर्कआऊट करतानाचे त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात.
प्रियाने नुकताच उमेशसोबत पहिला-वहिला जबरदस्त डान्स रील व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी टेरेसवर शूट केला आहे. ऑनस्क्रीनप्रमाणेच त्यांच्या डान्सची केमिस्ट्रीसुध्दा अफलातून असल्याचं पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ शेयर करताना प्रिया म्हणते, माझ्या क्रेझी पाटनरसोबतचा माझा पहिला रील व्हिडीओ. दोघंही डान्स व्हिडीओ फार एन्जॉय करत असल्याचे व्हिडीओत दिसले.
चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी उमेश-प्रियाच्या या डान्स व्हिडीओवर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.