बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरेच्या गाडीला अपघात झाला आहे. शिव त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे. या अपघातात शिवच्या चेह-यावर जखम झाली आहे. अमरावतीमधील वळगावच्या रस्त्यावर त्याच्या कारला टॅम्पोने धडक दिली.
मराठी कलाकार विश्वने हे वृत्त दिलं आहे. शिवच्या आई आणि बहिणीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. याशिवाय गाडीचं भरपूर नुकसान झालं आहे.