अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून उर्मिला कोठारे हे नाव सिनेसृष्टीत अग्रेसर आहे. तिने आपल्या सिनेमांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहेच. पण नृत्याच्या माध्यमातून तिने आपल्या मनात खास जागा निर्माण केली आहे.
उर्मिलाने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती एरिअल डान्स करताना दिसते आहे. सध्या ट्रेंड होत असलेल्या जुगनू चॅलेंज तिने एरिअल डान्स केला आहे. उर्मिला आगामी ‘एकदा काय झालं’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लेक जिजाच्या जन्मानंतर घेतलेल्या ब्रेकनंतर हा उर्मिलाचापहिलाच सिनेमा आहे.