मराठी हिंदी मालिका तसेच मराठी व हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच ‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.
‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती. या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.