By  
on  

शुटिंग दरम्यान आणलेला घोडा बिथरतो तेव्हा..... अमोल कोल्हेंनी शेअर केला थरार

अनेकदा शुटिंग दरम्यान काळजी घेऊनही लहान-सहान अपघात घडतात. विशेषत: ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सेटवर जिथं सेट मोठा असतो तिथं ही शक्यता जास्त असते. असाच एक किस्सा घडला आहे ‘"स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या सेटवर.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

 

मालिकेचे निर्माते अमोल कोल्हे यांनी हा किस्सा शेअर केला आहे. अमोल आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘इतिहास साकारण्यासाठी जिगर लागते! - ऐतिहासिक मालिका म्हटलं की साहसदृष्ये आणि घोडेस्वारी या अविभाज्य गोष्टी. पण कधी कधी सर्व खबरदारी घेऊनही अपघात घडतात आणि काळजाचा ठोका चुकतो.

अचानक घोडा बिथरण्यामुळे काय प्रसंग ओढवू शकतो याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. परवा "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी पुन्हा हा अनुभव आला. सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची भूमिका करणाऱ्या अमित देशमुख यांचा घोडा अचानक बिथरला आणि काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. परंतु मानलं अमित देशमुख यांना. पुन्हा सावरून घोड्यावर स्वार होऊन प्रसंग चित्रित केला. ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी जिगर लागते हे अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive