अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. पण नितीश सध्या चर्चेत आहे ते त्याच्या नव्या सिनेमाच्या टीजरसाठी. मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक सिनेमाचा टीजर समोर आला आहे. या टीजरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये बसलेले कपल दिसत आहे.
तर त्यांच्या शेजारीच लग्नाचे हार दिसत आहेत. त्यामुळे या टीजर ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. नितीशच्या सोबत असलेली मुलगी कोण? हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा विजय शिंदे, मकरंद माने, शशांक शेंडे हे सांभाळत आहेत. ‘सोयरं, ठिकाण ठरलंय ओ... यावं लागतंय बर का! कायबी हुंदया, १४ जानेवारी विसरायचं नाय! नवरीला आवरायला वेळ लागतो, तवा अजून जरा दम धरावा लागल राव...’ हे कॅप्शन देत नितीशने हा व्हिडियो शेअर केला आहे.
’