By  
on  

प्राजक्ता माळीने चाहत्यांच्या भेटीला आणली तिची निर्मितीसंस्था

अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता नवी ओळख समोर आली आहे. एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालकसह आता प्राजक्ताची कवयित्री ही नवी ओळख निर्माण झाली. अलीकडेच तिचा 'प्राजक्तप्रभा' हा कवितासंग्रह रसिकांच्या भेटीला आला. 

 

 

यासोबतच प्राजक्ता आता कलेच्या नव्या आयामात प्रवेश करते आहे. प्राजक्ताने स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली आहे. काल तिने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते उद्घाटन केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘आज गुरूपुष्यामृत- गुरूवार; आणि आजच्या मुहूर्तावर माझ्या गुरूंच्या (गुरू श्री श्री रविशंकरजी) शुभहस्ते माझ्या ‘निर्मिती संस्थेचं’ उद्घाटन करण्यात आलं.
.
“शिवोऽहम्” - Shiivoham Creations Private Limited.
(Finally)
.
त्रिवेणी आश्रम- पुणे इथे हजारोंच्या संख्येत जमलेल्या शिष्यांच्या भाऊगर्दीत मला त्यांना समक्ष भेटता आलं, त्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या.
.
माझं #अहोभाग्य
(screen वर नाव यायच्या आधीच ते “शिवोऽहम्” म्हणाले आणि आम्ही एकमेकांकडे बघत गोड हसलो. अविस्मरणीय.)’ प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive