By  
on  

आणि अप्सरेने दिलं सडेतोड प्रत्युत्तर, तुम्ही वाचलंत का?

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही यशोशिखरावर आहे. तिचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. झिम्मा या सिनेमाच्या यशाची चव चाखता चाखता आता सोनाली ही पांडू या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान ती सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. सतत विविध फोटोशूट व व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

सोनालीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडतो. सोनालीने अलिकडेच नवीन हेअरकट व नवीन हेअर कलर केलेला एक झक्कास व्हिडीओ अपलोड केला. तो पाहून एका युझरने केलेली कॉमेंटमुळे सोनाली भलतीच वैतागली. पण शांत न बसता तिनेसुध्दा त्या युझरला चोख प्रत्युत्तर दिलं. 

 

 

 

हवा में उडता जाए असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. यात सोनाली तिचा नवीन ऐअर कलर फ्लॉंट करताना दिसतेय.  केस सुंदर दिसतायत. पण असे वारंवार केस कलर केल्याने केस खराब होतील असं एका युझरने सोनालीला सांगितलं. तिचा हा सल्ला ऐकून सोनाली चांगलीच खवळली. ती तिला म्हणाली, तुला काय वाटतं एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल असं तुला वाटतं का, आणि हो मी दोन वर्षानंतर केस कलर करतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive