By  
on  

बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! म्हणत तेजस्विनी पंडितने दिला आठवणीला उजाळा

वडिलांच्या प्रेमाला आपल्या सगळ्यांच्या मनात खास जागा असते. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचंही तिच्या वडिलांवर खास प्रेम आहे. आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘ मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे.....?! घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही..... काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल...!

 

 

तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं....बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला.... हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि कामाला चहा कंपनी मध्ये होता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला.

आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं. त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील "प्रमाण" ह्याचं आमच्या घरी जाम महत्व....

हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं "प्रमाणाबाहेर" प्रेम आहे. तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेरा चं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली. आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा ! जिथे कुठे असशील, देव बरे करो... तेजस्विनीने अलीकडेच तिची निर्मिती संस्था सुरु केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive