By  
on  

शेवंता फेम अपुर्वाच्या ‘त्या’ पोस्टनंतर मालिकेच्या दिग्दर्शकाचं उत्तर चर्चेत

रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील अपुर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. पण अलीकडेच अपुर्वाने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांमध्येही उलट सुलट चर्चा सुरु आहे. अपुर्वानेच याबाबत पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर दिग्दर्शक राजू सावंत यांचं उत्तर चर्चेत आहे.

 

 

एका प्रथितयश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजू म्हणतात, ‘. शेवंताची भूमिका करणारी अपूर्वा नेमळेकर ही काही दिवसांपूर्वी या मालिकेमधून बाहेर पडली. मात्र ती बाहेर पडल्यानंतर आम्ही या भूमिकेसाठी तिच्या तोडीस तोड असणाऱ्या एका नव्या कलाकाराची निवड केली आहे. ज्याप्रकारे अपूर्वा ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती, तशीच ती सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.’ आता या मालिकेत शेवंताच्या व्यक्तिरेखेत अभिनेत्री कृतिका तुळसकर दिसणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive