By  
on  

‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ची दोन पुरस्कारांवर मोहोर

सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये यंदा मराठी सिनेमा गोदावरीने दोन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. गोव्यातील ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना जितेंद्र जोशी, ‘गोदावरी’ ही माझी पहिलीच निर्मिती. या चित्रपटासाठी दिग्र्दशक निखिल महाजन आणि आमचा चमू यांनी जी मेहनत घेतली, जो विश्वास दाखवला, त्याचाच परिपाक म्हणजे हा पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive