अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या ‘झिम्मा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोनालीने या सिनेमात मैथिलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.साखरपुडा आणि लग्न या कालावधीमधील द्विधा मनस्थितीत असलेली मुलगी तिने साकारली आहे. तर एकीकडे ती पांडू या सिनेमातून उषाच्या व्यक्तिरेखेतही प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
या दोन्ही व्यक्तिरेखेबाबत सोनालीने चाहत्यांकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोनाली आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘एकीकडे पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त shows घेऊन #झिम्मा चे यशस्वी खेळ सुरु आहेत आणि दुसरीकडे #पांडू चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे…. #superhit #jhimma मधल्या #Maithili ला मिळणारं प्रेम आणि #pandu च्या #usha मुळे आपल्या नावावर पुन्हा धमाल गाणी लागतायंत याचा प्रचंड आनंद, कृतज्ञता, समाधान’