By  
on  

पाहा Video : प्रार्थना बेहरेला छोटी मायरा जेव्हा दम भरते तेव्हा....

 'माझी तुझी रेशीमगाठ'मालिकेतील छोट्या परीने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावलं आहे.सोशल मिडीयावर परी फेम बालकलाकार मायरा वायकुळ प्रचंड फेमस आहे. मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा वायकुळ या मायलेकीच्या जोडीने सर्वांवर जादू केली आहे. नेहा आणि परीची ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा बरीच गट्टी जमते. दोघींही एकमेकांसोबत धम्माल करताना पाहायला मिळतात. 

प्रार्थना बेहरेने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा शूटींगदरम्यानचा बिहाईंड द सीन्सचा व्हिडीओ आहे.. यात प्रार्थना ही तिचा सीन संपवून बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांवर बसण्यासाठी येते. त्यावेळी परी तिच्याजवळ येते आणि म्हणते, “थांब थांब ही तुझी खुर्ची नाही, ही माझी आहे. त्यावर परी नाव लिहिलंय,” असे तिला सांगते.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive