By  
on  

'फॅन्ड्री'ची शालू फेम राजेश्वरी खरातची बॉलिवूड एन्ट्री

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना घायाळ करते. राजेश्वरीचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. राजेश्वरीचा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजेश्वरी आता थेट बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. 

 

'पुणे टू गोवा' या बॉलिवूडपटात राजेश्वरी झळकणार आहे. अमोल भगत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा कॉमेडी. एक्शन-थ्रीलर व सस्पेन्स पठडीतला असणार आहे. पुणे ते गोवा या रोमांचकारिक प्रवासावर आधारित हा सिनेमा आहे. राजेश्वरीला या सिनेमात पाहण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive