By  
on  

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या छोट्या दोस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सा रे ग म लिटील चॅम्प्स हा छोट्या दोस्तांचा सिंगीगी शो सध्या बराच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून पहिल्या पर्वाचे पंचरत्न विराजमान आहेत. एकूणच या सारेगमप या मंचाची जादूच काही आगळी आहे. या मंचाने मनोरंजनविश्वाला अनेक प्रसिध्द गायक-गायिका, संगीतकार, वादक दिले आहेत. 

सध्या सुरु असलेल्या सा रे ग म प लिटील चॅम्पचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यापूर्वी लिटिल चॅम्प्सने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांसोर उभे ठाकणार आहेत. तेव्हा विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता आता सर्वांना लागुन राहिली आहे, 

 

 

महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ ही जणांनी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूपच आनंदले.राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला व मनमोकळ्या गप्पाही मारल्या. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive