By  
on  

“मी मेल्यानंतर…”, कुशल बद्रिकेने केली लक्षवेधी पोस्ट

चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे विनोदवीर अभिनेता कुशल बद्रिकेचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून धम्माल तर करतेच. पण आता प्रथमच ही जोडी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.  दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाण्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दादा परत या ना हसवा ना… हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

या गाण्याच्या रिलीजनंतर कुशलने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरतेय. 

 

कुशल बद्रिकेने काल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यावर त्याने म्हटले, “मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी गाण असाव वाजवायला ज्यात मी आहे. असं मला कायम वाटायचं, असं एक जबरी गाण दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर सगळ्यात आधी तुम्हाला लै लै थँक्यू. मित्रांनो गाण नक्की बघा,” असं म्हणत कुशलने गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive