मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. चाहत्यांशी संपर्क साधायला त्याला नेहमीच आवडतं. टी.व्ही, सिनेमा , हिंदी मनोरंजनविश्व अशा सर्वच ठिकाणी स्वप्निलच्या अभिनयाची जादू चाहत्यांनी अनुभवली आहे. यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणा-या स्वप्निलने आता एका मोठा कारनामा केला आहे. हा कारनामा म्हणजेच त्याने सर्वात वेगवान अशी जगप्रसिध्द जॅग्वार कार खरेदी केली आहे.
स्वप्निल जोशी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने या नव्या सदस्याचं जल्लोषात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. ह्या लक्झरी कारच्या स्वागताचे फोटो स्वप्निलने इन्स्टाग्रामवर शेयर करताच चाहत्यांसह सर्वच सेलिब्रिटींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.
रितेश देशमुख, भरत जाधव, अमृता खानविलकर ,पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, सुबोध भावे. श्रेया बुगडे, सुयश टिळक आदि अनेक कलाकारांनी स्वप्निलला शुभेच्छा दिल्या आहेत.