हे गुलाबो ..! लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसला प्रिया बापटचा घायाळ करणारा अंदाज

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते. सिनेमांसोबतच वेबसिरीजचा प्लॅटफॉर्मही प्रिया गाजवतेय. मराठी सिनेसृष्टीतील गोड-गोजिरी आणि तितकीच सशक्त अभिनेत्री म्हणून प्रिया बापटने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रिया सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

प्रिया सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेकदा प्रियाचे मनमोहक फोटो पाहून चाहते पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतात. 

एका अवॉर्ड सोहळ्यसाठी प्रियाने हा खास पिंक कलरचा डिझाईनर गाऊन परिधान केला होता.

तिचा हा लुक पाहून, हे गुलाबो जरा इत्र गिरादो...असंच म्हणावं लागेल.

प्रियाच्या या झक्कास फोटोशूटवर चाहते आणि सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

Recommended

Loading...
Share