By  
on  

अखेर 'बॅन लिपस्टिकचं' गूढ उकललं, जाणून घ्या

'बॅन लिपस्टिक' म्हणत तेजस्विनी पंडीतने सर्वात आधी एक व्हिडीओ शेयर केला होता आणि मग स्नेहलता वसईकर, सोनाली खरे या अभिनेत्रींनीसुध्दा आपण लिपस्टिकचं समर्थन करत नाही म्हणत लिपस्टिक फुसणारे व्हिडीओ शेयर केले होते. या व्हिडीओंची सोशल मिडीयावर बरीच चर्चा झाली. ते खुप व्हायरल झाले. नेहमी लिपस्टिकच्या विविध शेड्स लावून मिरवणा-या या अभिनेत्री अशा लिपस्टिकच्या विरोधात कशा जाऊ शकतात हा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. 

तर या 'बॅन लिपस्टिक' चा उलगडा झाला आहे. संजय जाधव दिगदर्शित अनुराधा ही आगामी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, त्याच्याशीच संबंधित हे  'बॅन लिपस्टिक'प्रकरण आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही नवी कोरी वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे. 

 

लवकरच तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेब सीरिजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच सीरिजचे पोस्टर शेअर करत तिने, “सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. ‘अनुराधा’ येतेय… लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी’ अ‍ॅपवर!” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हा तिच्या आगामी वेब सीरिजचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीत सीरिजचे पोस्टर पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive