By  
on  

'विकी भाऊ, कतरिना वहिनी' म्हणत मराठी अभिनेत्याने दिल्या खास शुभेच्छा

बॉलिवूडचं पॉवर कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल अखेर लग्नबंधनात अडकले. आय़ुष्यभराच्या आणाभाका राजस्थान येथील फोर्टमध्ये शाही थाटात घेतल्या. कतरिना आणि विकीनं इन्स्टाग्रावर फोटो पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले. ,‘आमच्या मनात खूप खूप कृतज्ञता आणि प्रेम भरून राहिलं आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही आमचा एकत्र प्रवास सुरू करत आहोत.’

कतरिना आणि विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विकीनं पोस्ट करताच काही वेळातच चाहत्यांसह बॉलिवूडमधल्या त्यांच्या मित्रमंडळींनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर एका मराठी अभिनेत्याच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'विकी भाऊ आणि कतरिना वहिनी यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा' असं म्हणत अभिनेता अमेय वाघनं विकी आणि कतरिनाला शुभेच्छा दिल्यात. अमेयच्या या कमेंटला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

 

अमेयची लोकप्रिय प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहर याच्या आगामी चित्रपटात वर्णी लागली असून तो विकी कौशल याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अमेय विकिसोबत 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटात झळकणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive