By  
on  

‘कारखानिसांची वारी’ सोनीलिव्‍ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला

एका अफलातून प्रवासावर आधारित कारखानीसांची वारी हा मराठी सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला आला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेला असा हा पुरस्कारप्राप्त सिनेमा आहे. या धमाल, पण हृदयस्‍पर्शी चित्रपटाचे कथानक एका संयुक्‍त कुटुंबाच्‍या अवतीभोवती फिरते, जे अनपेक्षितरित्‍या साहसी, घटनापूर्ण प्रवासावर जातात आणि लाडक्‍या कुटुंबप्रमुखाच्‍या निधनानंतर आपापसातील मतभेद व वादविवादांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करतात.हा चित्रपट उत्‍कट भावनांना दाखवतो, ज्‍या सामान्‍यत: आपण आपल्‍या कुटुंबियांबद्दल व्यक्त करण्यास घाबरतो. 

पुण्‍यामध्‍ये राहणा-या कारखानीस कुटुंबातील वयस्‍कर कुटुंबप्रमुखाचे निधन होते. त्‍यानंतर त्‍याची भावंडे व मुलामध्‍ये त्‍यांच्‍या अंतिम इच्‍छेनुसार त्‍यांच्‍या अस्थि विसर्जनाप्रती घटनापूर्ण प्रवास सुरू होतो. 'कारखानीसांची वारी' (अॅशेस् ऑन ए रोड ट्रिप) हा कौटुंबिक नात्‍यांचे आत्‍मपरीक्षण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट वारशामध्‍ये मिळालेल्‍या सांस्‍कृतिक मूल्‍यांबाबत प्रश्‍न निर्माण करतो.

प्रतिष्ठित ३३व्‍या टोकियो इंटरनॅशनल फिल्‍म फेस्टिवलमध्‍ये या चित्रपटाचे वर्ल्‍ड प्रिमियर सादर करण्‍यात आले आणि आंतरराष्‍ट्रीय चित्रपट समीक्षक मॅथ्यू हार्नोन यांनी या चित्रपटाची सर्वोत्तम ५ चित्रपटांपैकी एक म्‍हणून प्रशंसा केली. 

'कारखानीसांची वारी' चित्रपटामध्‍ये अमेय वाघ, मृण्‍मयी देशपांडे, मोहन अगाशे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, वंदना गुप्‍ते, शुभांगी गोखले आणि अजित अभ्‍यंकर असे प्रतिभावान कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती अर्चना बोरहडे यांच्या नाइन आर्चर्स पिक्‍चर कंपनीने केली असून सह-निर्मिती एबीपी स्‍टुडिओजने केली आहे.

पहा 'कारखानीसांची वारी' १० डिसेंबरपासून फक्‍त सोनीलिव्‍हवर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive